Saturday, January 11, 2025

/

राज्य भाजपने नवा जनादेश घ्यावा : ‘डिकें’ चे आव्हान

 belgaum

कोरोना परिस्थिती आणि पूर परिस्थितीसह अनेक मुद्दे हाताळण्यात कर्नाटकातील सत्ताधारी भाजप सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. त्याचप्रमाणे सरकार विसर्जित करून निवडणुकीद्वारे भाजपने जनतेकडून नवा जनादेश घ्यावा, असे आव्हानही दिले आहे.

राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत काँग्रेस पक्षाचा अहवाल स्वीकारल्यानंतर रविवारी सदाशिवनगर बेंगलोर येथील आपल्या निवासस्थानी ते बोलत होते. एका बेळगाव जिल्ह्यात भाजपचे दहापेक्षा जास्त आमदार असताना पूर परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याबद्दल या काँग्रेस प्रमुखांनी सरकारवर कडाडून टीका केली.

तसेच कर्नाटकला जास्त पूर मदत निधी मिळावा यासाठी भाजप खासदार केंद्रावर का दबाव आणत नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासंदर्भात बोलताना शिवकुमार म्हणाले की, या बाबतीत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात स्थलांतरितांसह शेतकऱ्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनीच मदत केली आहे. आमचे नेते व कार्यकर्ते स्वखर्चातून जीवनावश्यक साहित्याचे किट्स, ऑक्सीजन सिलेंडर आणि वितरण करत असताना भाजपचे नेते सरकारी पैशातून खरेदी केलेल्या जीवनावश्यक साहित्यांच्या किट्सवर स्वतःचे फोटो छापून त्याचे वाटप करत होते.Dk shivkumar

आम्ही जनहितार्थ 1225 ॲम्ब्युलन्स करून देण्याबरोबरच 12 लाख 53 हजार मेडिकल किट्स, 93 लाख 47 हजार 867 जीवनावश्यक साहित्याचे किट्स आणि 24 हजार 654 ऑक्सिजन सिलेंडर्सचे वितरण केले आहे, अशी माहिती शिवकुमार यांनी दिली.

काँग्रेस पक्षाने अडकून पडलेल्या स्थलांतरितांसाठी मोफत वाहतूक व्यवस्था करून दिली. हॉस्पिटल बेड्स आणि औषधांमधील घोटाळे उघडकीस आणण्यासह राज्यभरात हजारो जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वितरण केले आहे. आमचे नेते शामनुरु शिवशंकरप्पा यांनी स्वखर्चाने कोरोना प्रतिबंधक लसीचे 3 लाख डोस वाटले आहेत, अशी माहिती देऊन कोरोनामुळे बळी गेलेल्यांच्या नातलगांना ‘योग्य’ मृत्यू प्रमाणपत्र दिले जात नसल्याचा आरोपही डी. के. शिवकुमार यांनी केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.