Sunday, November 17, 2024

/

खाणीतील डोहात बुडून युवकाचा दुर्देवी मृत्यू

 belgaum

खडी मशीन खाणीमधील डोहामध्ये पोहावयास गेलेल्या एका युवकाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव -चंदगड सीमेवरील कोनेवाडी गावामध्ये आज दुपारी 1:45 वाजण्याच्या सुमारास घडली.

प्रवीण नागेंद्र कंग्राळकर (वय 19, रा. कोनेवाडी) असे पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या दुर्देवी युवकाचे नांव आहे. सदर घटनेची माहिती मिळताच हेल्पलाइन इमर्जन्सी रेस्क्यू फाउंडेशन बेळगावने अवघ्या 20 मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचून पुढील 15 मिनिटात बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळवले आहे.

एचईआरएफ बचाव पथकाचे प्रमुख बसवराज हिरेमठ, सदस्य वैभव चव्हाण -पाटील, विशाल हंडे, राजू टक्केकर, पंकज हंडे, शुभम नागन्नावर, शंकर पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते. सदर घटनेची पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.