गेल्या दोन दिवसापूर्वी काकती नजीकच्या जंगल प्रदेशाबाहेर आढळून आलेल्या एका धिप्पाड गवीरेड्याचा दुर्देवाने आज शनिवारी मृत्यू झाला.
गेल्या दोन दिवसापूर्वी हा गवीरेडा काकती फॉरेस्ट रेंजमधील गुदिहाळ गावानजीकच्या परिसरात वावरताना दिसला होता. मनुष्याचा वावर, त्यांचा आवाज तसेच वाहनांच्या गोंगाटामुळे हा गवीरेडा बिथरला होता.
भेदरलेल्या अवस्थेत फिरणाऱ्या या गवीरेड्याकडे वनखात्याने देखील दुर्लक्ष केले होते. अखेर आज शनिवारी या गवीरेड्याचा मृत्यू झाला.
दोन दिवसापूर्वी गुदिहाळ गावानजीक हा गवीरेडा जेंव्हा निदर्शनास आला त्याचवेळी वनखात्याने त्याला पकडून जंगलात सोडले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचू शकले असते, असे मत गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
सदर गवी रेड्याच्या मृत्यूस वनखात्याचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोपही केला जात आहे.