गेल्या दोन दिवसापासून सतत होत असलेल्या पावसाने नदी नाल्याना पुन्हा एकदा पूर आला असून बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील सर्वच नदी नाले तलाव तुडुंब भरले आहेत. गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाणी आले असून बेळगाव कोल्हापूर वाहतूक बंद करण्यात आली आहे.
बेळगाव तालुक्यात देखील पावसाचा जोर वाढला मार्कंडेय नदी मन्नुर ब्रिज जवळ रस्त्यावर पाणी आले आहे त्यामुळे मन्नुर गोजगा संपर्क तुटला आहे.वाघवडे येथील नाल्यात वाहून जाणाऱ्या एका इसमाला ग्रामस्थांनी काल वाचवले होते.
पश्चिम महाराष्ट्रात संततधार सुरूच असून जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहे नद्यां धोक्याचा पातळी जवळ आल्या आहेत
पुणे बंगळुरू हायवे वे वेदगंगा नदी पुलावर निपाणी जवळील यमगरनी जवळ हायवेवर पाणी आल्याने बेळगाव कोल्हापूर वाहतूक बंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर 2 की मी अगोदर बॅरिकेट लावण्यात आले आहेत वाहनांना अडवले जात आहे.धारवाड हिरेबागेवाडी आणि हत्तरकी टोल नाक्या वरूनच महाराष्ट्राकडे जाणाऱ्या गाड्याना डायव्हर्ट केले जात आहे त्यामुळे अनेक वाहने हायवे सोडून पर्यायी मार्गाचा अवलंब करत आहेत.
शिवाजीनगर भागांत घरात शिरले पाणी
गुरुवारी रात्री शिवाजी नगर वीरभद्र नगर भागातील अनेक घरात पाणी शिरले आहे किल्ला तलाव ओव्हर फ्लो झाला आहे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. नानावाडी मराठा कॉलनी शास्त्रीनगर, आणि नाल्या जवळील भागांत पाणी साचू लागले आहे त्यामुळे जनतेने सुरक्षित घरातच राहावे घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
मलप्रभा नदी तुडुंब
लोंढा जवळ पावसाने ट्रक पाण्यात अडकली होती तर खानापूर शहरातील मलप्रभा नदीवरील पूल ओव्हरफ्लो झाला आहे 2019 नंतर हा पूल यावर्षी पहिल्यांदा ओव्हरफ्लो झाला असून ब्रिजवर पाणी आले आहे.जांबोटी जवळील हबबनट्टी मारुती मन्दिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे.