नैऋत्य रेल्वेच्या नूतन महाव्यवस्थापकपदी संजीव किशोर, आयआरएसएमआय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संजीव किशोर यांची यापूर्वी रेल्वे बोर्डाच्या अतिरिक्त सदस्यपदी (उत्पाद sanjeev kishorन केंद्र) नेमणूक झाली होती. गजानन मल्ल्या हे गेल्या एप्रिल 2021 पासून नैऋत्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार सांभाळत होते.
नूतन महाव्यवस्थापक संजीव किशोर यांना आग्नेय रेल्वे, रेल्वे कॉच फॅक्टरी कपूर्थळा, मध्य रेल्वे, आरआयटीईएस, सीओएफएमओडब्ल्यू, रेल्वे माहिती यंत्रणा मुख्यालय नवी दिल्ली, रेल्वे बोर्ड आणि रेल्वे व्हील फॅक्टरी येलहंका बंगलोरे येथील कामाचा मोठा अनुभव आहे.
भारतीय रेल्वेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिक अँड इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग (आयआरआयएमइई) जमालपूर संस्थेचे माजी विद्यार्थी असणारे संजीव अभियांत्रिकी पदवीधर आहेत. एमडीआय गुरगांवमधून त्यांनी पदव्युत्तर पदविका संपादन केली असून सर्वंकष सर्वोत्तम कामगिरीसाठी त्यांना पंतप्रधान पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एमडीआय गुरगांव येथून त्यांनी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये डॉक्टरल दर्जाचा एक्झिक्युटिव्ह फॅलो प्रोग्रॅम पूर्ण केला आहे.
अमेरिकेतील विद्यापीठातून त्यांनी ॲडव्हान्स स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतले आहे. इटली येथील एक्झिक्यूटिव्ह लीडरशिप प्रोग्राममध्ये त्यांचा सहभाग होता. अनेक शोधप्रबंध त्यांच्या नांवावर आहेत.
वडोदरा येथील नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंडियन रेल्वे, एमडीआय गुरगांव येथील औद्योगिक वसाहत आदी ठिकाणी सरकारकडून त्यांना अतिथी व्याख्याते म्हणून निमंत्रित केले जात असते. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रकल्प हाताळण्यात संजीव किशोर यांचा हातखंडा असल्याचे मानले जाते.