गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या महामारीत रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना डॉक्टर म्हणजे देवदूत वाटत आहेत कारण कोरोना झाल्याने भयभीत झालेल्याना देवच वाचवू शकतो आणि डॉक्टरांच्या माध्यमातून देवदूत रुग्णांसाठी धावून आले असे विवा फार्माचे संचालक एक प्रसिद्ध घाऊक औषध वितरक हर्षवर्धन इंचल यानी सांगितले.
जायंट्स मेनच्या वतीने डॉक्टर्स दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
जायंट्स सारख्या सामाजिक संघटनानी लसीकरणा बाबत जनजागृती करणे गरजेचे असून प्रशासनाच्या सहकार्याने लसीकरण मोहीम राबविण्यात यावी असेही ते म्हणाले.
व्यासपीठावर अध्यक्ष संजय पाटील,प्रमुख पाहुणे हर्षवर्धन इंचल, विशेष समिती सदस्य मोहन कारेकर, उपाध्यक्ष शिवकुमार हिरेमठ आणि सचिव विजय बनसुर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत विभागीय संचालक मदन बामणे यांनी केले. कार्यक्रमाचे उदघाटन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रज्वलीत करून करण्यात आले.
गेल्या वर्षभरात कोव्हिडमुळे ज्यांना जीव गमवावा लागला त्यांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
समर्थ नगर येथील प्रकाश राजगोळकर, शहापूर येथील डॉ संजय आढाव, काकतीवेस येथील मधुसूदन मुरकुटे, लाईफकेअर हॉस्पिटलचे डॉ शैलेंद्र मुतगेकर, उचगावचे डॉ वामन चोपडे, डेक्कन हॉस्पिटलचे डॉ झिशानअली जमादार यांना व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला.
यावेळी उपस्थित डॉक्टरांनी जायंट्सप्रति कृतज्ञता व्यक्त करून कोव्हिड रुग्णवार उपचार करताना आलेला अनुभव कथन केला.अध्यक्षीय समारोप करताना संजय पाटील यांनी गौरवमूर्ती डॉक्टरांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तुकाराम बँकेच्या अर्जुनराव दळवी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमास उपाध्यक्ष सुनिल मूतगेकर खजिनदार लक्ष्मण शिंदे, आर एम चौगुले, आर आय पाटील, विश्वास पवार,शिवराज पाटील, अनंत लाड, अशोक हलगेकर,सतिश बांदिवडेकर,अविनाश पाटील, अरुण काळे, अनिल चौगुले,संजय पाटील, राहुल बेलवलकर,अजित कोकणे, दिगंबर किल्लेकर, सुनिल चौगुले, राजू बांदिवडेकर, राजू जैन, विलास कंग्राळकर, अरविंद देशपांडे,सुनिल मुरकुटे,मोहन पत्तार, पांडुरंग पालेकर उपस्थित होते.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक पावशे यांनी तर आभार भरत गावडे यांनी केले.