बेळगाव येथे सुवर्ण विधानसौध बांधल्यानंतर वारंवार अधिवेशन घेण्यात आले. मात्र 2018 पासून या ठिकाणी अधिवेशन घेण्यात आले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी पावसाळी अधिवेशन भरवावे अशी मागणी करण्यात आली आहे.
उत्तर कर्नाटक प्रदेशातील अनेक नेते, विधानपरिषदेचे अध्यक्ष व जेडीएस नेते बसवराज होरट्टी आणि मुख्य सचेत महंतेश कवतागीमठ यांनी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याकडे ही मागणी केली आहे.
बेळगाव जवळील हलगा येथील सुवर्ण सौध 2018 नंतर कर्नाटक विधी मंडळाचे अधिवेशन घेण्यात आलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशन या ठिकाणी घेण्यात यावे असेही त्यांनी म्हटले आहे.
बसवराज होरट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून येथे अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. होरट्टी म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी आणि कवटागीमठ यांनी बेळगाव येथील अधिवेशनाच्या माजी सल्ल्यासाठी सहमती दर्शविली आहे.
यापूर्वी प्रत्येक वर्षी १०-१२ दिवस बेळगाव येथे अधिवेशन घेण्यात येत होते. कर्नाटकातील दुसरी राजधानी म्हणून बेळगावकडे पाहिले जाते. मात्र 2018 पासून या ठिकाणी अधिवेशन घेण्यात आले नसल्याने समस्या निर्माण होत आहेत.
२०१२ मध्ये सुवर्ण सौधचे मान्यतेने त्याचे उद्घाटनही करण्यात आले. 400 कोटी रुपये खर्च करून सुवर्ण विधानसभा उभारण्यात आली. मात्र ती आता तशीच पडून आहे. त्याचा उपयोग कोणत्याच करण्यासाठी होत नाही. काही सरकारी अधिकारी कार्यालय याठिकाणी स्थलांतरित करण्यात आली तरी त्याची पूर्तता झाली नाही यासाठी अधिवेशन घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांसह राज्यभरातील सरकारी अधिकारी, सुरक्षा कर्मचारी आणि प्रसारमाध्यमे यांचे मुख्यालय बंगळुरू येथे आहे सुवर्ण सौध मध्ये अजून एकाही सरकारी कार्यालयांची कागदपत्रे तसेच बिले मिळत नाहीत ती बेंगलोर वरून आणावी लागतात.
अधिवेशनाच्या काही दिवस आधी परिसरातील सर्व खासगी हॉटेल्समधील खोल्या बुकिंग करण्यात येते. त्यांची बिलेही अजून प्रलंबित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे सर्व बिले देऊन या ठिकाणी अधिवेशन घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
बेळगावातील अधिवेशनाना झालेला खर्च
2018 – 11.24 कोटी
2017 – 31 कोटी
2016 – 16 कोटी
2015 – 13 कोटी
2014 – 14 कोटी
2013 – 8 कोटी