Monday, January 27, 2025

/

स्मार्ट सिटीचे नवे एमडी लवकरच करणार ‘त्या’ उद्यानांची पाहणी

 belgaum

बेळगाव उत्तर मतदार संघ आणि ग्रामीण मतदार संघाच्या सीमेवरील कुवेंपूनगर भागातील विकास कामे प्रलंबित असलेल्या पाच उद्यानांची आपण येत्या आठवड्याभरात पाहणी करून पुढील कार्यवाही करू, असे आश्वासन बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे नवे एमडी अर्थात व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी यांनी बेळगाव Live शी बोलताना दिले.

बेळगाव उत्तर मतदार संघ आणि ग्रामीण मतदार संघाच्या सीमेवर असलेल्या कुवेंपूनगर भागातील जवळपास 5 उद्यानांची सौंदर्यीकरणासह विकासाची कामे प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये असमाधान व्यक्त होत आहे. यासंदर्भात बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीनी संपर्क साधला असता एमडी प्रवीण बागेवाडी बोलत होते.

बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून अधिकार पदाची सूत्रे मी नुकतीच हाती घेतली आहेत. संबंधित उद्यानांबाबत मला फारशी माहिती नाही. त्यांचे विकास काम का प्रलंबित राहिले आहे? हे पहावे लागेल. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. सध्या पाऊस आहे, तथापि येत्या आठवड्याभरात मी संबंधित उद्यानांना भेटी देऊन पाहणी करेन  आढावा घेईन आणि त्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही प्रवीण बागेवाडी यांनी स्पष्ट केले.Kuvempu nagar gardens

 belgaum

बेळगाव उत्तर आणि ग्रामीण मतदार संघाच्या सीमेवरील हनुमाननगरच्या ठिकाणी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विकास कामे राबविण्यात येत आहेत. या ठिकाणच्या उद्यानांचे सौंदर्यीकरण आणि इतर विकास कामासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुमारे 2.63 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यासाठीच्या निविदा सहा महिन्यापूर्वी काढून वर्कऑर्डर देण्यात आली असल्याचे समजते. मात्र अद्याप संबंधित कंपनीने काम सुरू न केल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कुवेंपूनगर येथील चिक्कू बाग, महाबळेश्वर पार्क, महालक्ष्मी टेंपल पार्क, पोलीस कॉलनी पार्क आणि सारथीनगर अशा पाच ठिकाणच्या उद्यानांचे सौंदर्यीकरण आणि विकास केला जाणार आहे. या कामाचे कंत्राट मुंबईतील देव इंजिनिअर्स या कंपनीला देण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.