गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसाने बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यातच या तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.
जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी सोमवारी खानापूरला भेट देत पुर परिस्थितीची माहिती घेतली त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करत तात्काळ लोंढा रामनगर रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या.
तहसीलदार रेशमाबानो ताशीलदार यांच्याकडून माहिती घेत लोंढा रामनगर रस्ता दुरुस्त करण्याबाबत महामार्ग प्राधिकरण बरोबर चर्चा केली.
हिरेमठ यांनी खानापूर तालुक्यात झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला रस्त्यांची आणि पुलांची पहाणी केली.खानापूर पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि आजूबाजूचा जलमय झालेला परिसर तसेच नदी जवळ पहाणी केली.
यावेळी तहसीलदार रेशमा ताशीलदार स्थानिक नगर परिषदेच्या अधिकारी उपस्थित होते.
काल रविवारी हंगामी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्या दौऱ्या दरम्यान झालेल्या आमदार मंत्र्यांच्या पूरग्रस्त आढावा बैठकीत आमदार अंजलीताई निंबाळकर यांनी खानापूर तालुक्यातील रस्ते आणि पुलांच्या अवस्थेबाबत आणि आरोग्य सुविधेबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती त्याची दखल घेत जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी खानापूरात जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे.