Saturday, January 18, 2025

/

812 इतकी घटली सक्रीय रुग्णांची संख्या

 belgaum

बेळगाव जिल्ह्यामध्ये आज सोमवार दि. 20 जुलै रोजी नव्याने 75 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. हॉस्पिटलमधून 148 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 812 इतकी कमी झाली आहे.

जिल्ह्यात आज एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 849 झाली आहे. जिल्ह्यातील गेल्या आठवड्याभरातील पॉझिटिव्हिटी रेट 1.82 टक्के इतका आहे. प्रयोगशाळेमध्ये आज स्वॅबच्या 4109 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून जिल्ह्यात दिवसभरात 4266 जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 812 झाली आहे, तर 142 जण कोरोना मुक्त झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज नव्याने आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्यातील 32 अथणी 4, चिक्कोडी 9, गोकाक 8, हुक्केरी 14, खानापुर 5, रामदुर्ग रायबाग आणि इतर प्रत्येकी 1 अशा एकूण 75 रुग्णांचा समावेश आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.