मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हलगा -बस्तवाड येथील सुवर्ण विधानसौध परिसरात कमालीचा गारठा निर्माण झाला असून पाऊस वार्यापासून संरक्षण मिळावे यासाठी एका बाजूला पडदा बांधलेला असतानादेखील थंडीमुळे येथील कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण झाले आहे.
मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बेळगाव सुवर्ण विधानसौध परिसरातील थंडीचे प्रमाण वाढले आहे. पाऊस वार्यापासून संरक्षण मिळावे यासाठी सुवर्ण सौधच्या उत्तर दिशेला पडदा बसविण्यात आला आहे. मात्र तरीही वाऱ्यासह पावसाचे पाणी आत घुसत आहे.
पांढरा हत्ती म्हणून निर्भत्सना होऊ लागल्यामुळे सुवर्ण विधानसभेमध्ये विविध सरकारी विभागांची 21 कार्यालय स्थलांतरित करण्यात आली आली आहेत. या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून कर्मचाऱ्यांनी काम सुरू केले आहे. मात्र सध्या पाऊस आणि थंडीमुळे येथील कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण झाले आहे.
सुवर्ण विधानसौधच्या उत्तर दिशेहून सातत्याने सोसाट्याचा वारा येत आहे. त्यामुळे उत्तर दिशेला असलेल्या कार्यालयांना भव्य पडदे बसविण्यात आले आहेत. परिणामी वाऱ्याची बऱ्यापैकी अडवणूक झाली असली तरी अडचणी वाढल्या आहेत. या ठिकाणी प्रचंड गारठा निर्माण झाले असल्यामुळे काम करणे कठीण बनले आहे.
मागील आठवड्यात बेळगाव शहर परिसरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सुवर्ण विधानसौधमध्ये पाणी आले नसले तरी पाऊस थेट आत घुसत होता. त्यामुळे सुवर्णसौधच्या पॅसेजमध्ये पाणी साचले होते. या पाण्यामधूनच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अद्याप ये -जा करावी लागत आहे.