कॅम्प पोलिसांनी आज शुक्रवारी दोघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील अंदाजे 4 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 10 मोटरसायकली जप्त केल्या.
प्रसाद अशोक पाटील (वय 24, रा. राजारामनगर सेकंड क्रॉस, उद्यमबाग -बेळगांव) आणि अक्षय अशोक तांदळे (वय 22, रा. येळ्ळूर रोड, येळ्ळूर -बेळगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा आरोपींची नांवे आहेत.
या दोघांकडून पोलिसांनी चोरीला गेलेल्या 10 मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची किंमत अंदाजे 4 लाख 50 हजार रुपये इतकी होते. या मोटरसायकली बेळगाव शहरासह आसपासच्या विविध ठिकाणाहून चोरीला गेल्या होत्या.
पोलीस आयुक्त डॉ. त्यागराजन, पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे, डीसीपी सी. आर. निलगार आणि खडेबाजार उपविभागाचे एसिपी चंद्रप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीसांनी उपरोक्त कारवाई केली.
याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे. कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी महेश पाटील, बी. एम. नरगुंद, बी. एस. रुद्रापूर, श्रीधर तळवार आणि ए. बी. पट्टेद यांनी उपरोक्त कारवाईत भाग घेतला होता. या सर्वांचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी अभिनंदन करून शाबासकी दिली आहे.
सोशल क्लब वर धाड
बेळगाव पोलिसांनी कलखांम्ब येथील भाग्यलक्ष्मी सोशल स्पोर्ट्स क्लब वर कोविड निर्बंध उल्लंघन केल्या प्रकरणी धाड टाकून, पाच मोबाईल 6100 रुपये जप्त करत 8 जणांना अटक केली आहे.