नागालँड सीमेवर सेवा बजावत असताना बेळगाव जिल्ह्यातील जवानाला हुतात्म्य पत्कराव लागलं आहे. गोकाक तालुक्यातील कोन्नुर गावचा मंजूनाथ अप्पाणा गौडन्नावर वय 38 असे या शहीद जवानाचे नाव आहे.
नागालँड सीमेवर गस्त घालत असतेवेळी गाडीला झालेल्या अपघातात या जवानाचे निधन झाले आहे. 18 वर्षांपूर्वी मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप मध्ये भर्ती झालेला हा जवान नागालँड सीमेवर कर्तव्य बजावत होता.
सीमेवरील जंगलात गाडी चालवताना झालेल्या अपघातात या जवानाला हुतात्म्य पत्कराव लागलं आहे.
मंजूनाथचे पार्थिव उद्या सोमवारी सायंकाळी 6 वाजता गोवा मार्गे बेळगावहुन गोकाक कोन्नुर येथे त्याच्या मूळ गावी पोहोचणार आहे.
पार्थिवावर गोकाक जवळील कोन्नुर शिवापूर जवळ अंतिम संस्कार केले असून गोवा मार्गे जातेवेळी बेळगावात देखील या जवानाला श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.