एकीकडे शहर स्मार्ट होत असताना बेळगाव शहराच्या आजूबाजूला असलेली शेतवाडी नष्ट करण्याचा घाट घालणारे प्रशासनाने शेतवाडीतील रस्त्यांची मात्र दयनीय अवस्था झाली असून त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे याची दखल घेत बेळगाव शेतकरी संघटनेची बैठक झाली या बैठकीत यावर आवाज उठवण्याचे ठरवण्यात आले.
एकीकडे इतर रस्ते गुळगुळीत होत असताना शेतवाडीतील रस्ते योजना कागदावरच असून शेतकऱ्यांसाठी रस्ते दुरुस्त करण्यात प्रशासनाने अनास्था दाखवली आहे. सोमवारी सकाळी शेतकरी संघटनेचे बैठक समर्थ नगर येथील पाटील राईस मिल येथे संपन्न झाली.यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चांगले पक्के रस्ते मिळावेत, रस्त्यांवरील उगवलेले रान व चिखल काढून रस्त्याचे मजबुतीकरण करावे असे सर्वानुमते सुचविण्यात आले.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याकरिता आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत, तरी काही शेतकऱ्यांना या नुकसान भरपाई संदर्भात माहिती नसल्याने अजूनही वेळ गेली नाही तरी शेतकऱ्यांनी येत्या 10 जुलै पर्यंत आपली कागदपत्रे आमच्या शेतकरी कार्यालयात जमा करावी, शेतकऱ्यांच्या रस्ते संदर्भात आम्ही आमदार अनिल बेनके यांना मंगळवारी सकाळी भेट घेणार आहोत असे सांगितले.
यानंतर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील जाधव म्हणाले शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसल्याने शेतीचे अवजारे ट्रॅक्टर विविध यंत्रसामग्री निहान करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते बहुतांश ठिकाणी केवळ रस्ता नाही म्हणून पिके घेता येत नाहीत ही अडचण लक्षात घेऊन शासनाने शेत रस्ते योजना लवकरात लवकर सुरू करावे.तसेच भाजी मार्केटच्या बाजूचा सोमनाथ नगर ते बळारी नाला पर्यंत शेतीरस्ता व हरिकाका कंपाउंड येथील रस्तासाठी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आमदार अनिल बेनके यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना असे आदेश दिले पण याकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगितले.
यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, तालुकाध्यक्ष सुनील जाधव, सुनील खनुकर, निळकंठ चौगुले, गडगप्पा हंडीगळ,महेश बंडमंजी ,चंद्रकांत चौगुले, महेश हंडीगळ, यालापा जिनगौडा, अनंत चौगुले,रमेश उसुलकर, राजू पावले, लक्ष्मण मननोळकर,यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.