चिक्कोडी ग्रामीण भागातील रामनगर येथे बारा वर्षाची एक बालिका नाण्याला आलेल्या पुरामध्ये वाहून मयत झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
किरण विभूती असे नाल्यांमध्ये वाहून मयत झालेल्या मुलीचे नांव आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिक्कोडी परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे रामनगर येथील नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत आहे.
आपल्या आई समवेत हा पूल ओलांडत असताना तोल जाऊन पाण्यात पडलेली किरण जोरदार प्रवाह बरोबर पुराच्या पाण्यात वाहून बेपत्ता झाली होती.
डोळ्यादेखत आपली मुलगी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे पाहून किरणच्या आईने केलेल्या आक्रोशामुळे उपस्थितांची मने हेलावून गेली होती. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी शोध कार्य हाती घेतले होते शनिवारी तिचा मृतदेह मिळाला आहे.