बेळगाव जिल्ह्यामध्ये आज बुधवार दि. 21 जुलै रोजी नव्याने 61 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. हॉस्पिटलमधून 102 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 770 झाली आहे.
जिल्ह्यात आज आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 850 झाली आहे. जिल्ह्यातील गेल्या आठवड्याभरातील पॉझिटिव्हिटी रेट 1.52 टक्के इतका झाला आहे.
प्रयोगशाळेमध्ये आज स्वॅबच्या 4,975 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून जिल्ह्यात दिवसभरात 815 जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 770 झाली आहे, तर 102 जण कोरोना मुक्त झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे राज्यभरात एकूण 1639 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
आज नव्याने आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये बेळगाव तालुक्यातील 19, अथणी 4, चिक्कोडी 21 आणि बैलहोंगल 2 अशा एकूण 61 रुग्णांचा समावेश आहे.