Monday, January 6, 2025

/

…अन् नदीच्या मध्यभागी अडकून पडला युवक!

 belgaum

निपाणी तालुक्यातील सिदनाळ गावानजीक तुडुंब वाहणाऱ्या वेदगंगा नदीपात्राच्या मध्यभागी एका झाडाच्या आधारे अडकून पडलेल्या युवकाला वाचविण्यासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले आहे.

वेदगंगा नदीपात्रात मध्यभागी अडकून पडलेल्या युवकाचे नांव प्रज्वल कुलकर्णी असे आहे. गेल्या मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे इतर नदी-नाल्यांना प्रमाणे वेदगंगा नदी देखील तुडुंब भरून वाहत आहे.

या नदीच्या पात्रात आज सकाळी पाय घसरून पडलेला प्रज्वल पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर गटांगळ्या खात वाहून जात होता. मात्र दैव बलवत्तर म्हणून नदीच्या मध्यभागी वाहून आलेल्या एका मोठ्या झाडाचा आधार त्याला मिळाला. सध्या नदीतील सदर झाडावर सुरक्षित जागी प्रज्वल मदतीची प्रतीक्षा करत बसून आहे.Youth river

स्थानिकांकडून सदर प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशामक दल आणि एनडीआरएफ दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या सर्वांनी नदीपात्रात अडकून पडलेल्या प्रज्वल कुलकर्णी याला सुखरूप काठावर आणण्यासाठी बचाव कार्य हाती घेतले आहे. हे बचाव कार्य पाहण्यासाठी नदीकाठावर बघ्यांची गर्दी झाली होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.