बेळगाव जिल्ह्यात आज बुधवार दि. 16 जून रोजी नव्याने 254 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 895 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 3,860 इतकी झाली आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यात आज 14 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 721 झाली आहे. गेल्या आठवड्याभरात जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट 6.45 टक्के इतका आहे.
प्रयोगशाळेत आज 6715 चांचण्या झाल्या असून जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या सध्या 3,860 इतकी आहे. आज दिवसभरात 895 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज आढळून आलेल्या 254 रुग्णांपैकी जिल्ह्यातील विविध तालुक्यात पुढीलप्रमाणे रुग्ण आढळून आले आहेत. अथणी 12, बेळगाव 104, बैलहोंगल 10, चिक्कोडी 60, गोकाक 17,
हुक्केरी 12, खानापूर 8, रामदुर्ग 4, रायबाग 15, सौंदत्ती 9 आणि इतर 3. जिल्ह्यात यापूर्वी सर्वाधिक 2,234 रुग्ण गेल्या 19 मे 2021 रोजी आढळून आले होते, तर 1 जून 2021 रोजी सर्वाधिक 4,270 रुग्ण कोरोना मुक्त झाले होते.