Wednesday, January 22, 2025

/

एकदम हटविला जाणार नाही लॉक डाऊन : आर. अशोक

 belgaum

राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉक डाउनचा कालावधी समाप्त होत आला असल्याने आता येत्या 14 जूननंतर बहुदा चार किंवा पाच टप्प्यांमध्ये अनलॉकिंग प्रक्रियेला प्रारंभ होईल, अशी माहिती कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी बुधवारी दिली.

राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीने (टीएसी) संपूर्ण कर्नाटकात टप्प्याटप्प्याने लॉकडाउन हटविला जावा अशी शिफारस केली आहे. त्यामुळे कोरोनाने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी 14 जूननंतर म्हणजे लाॅक डाऊन समाप्त झाल्यानंतर राज्य सरकार छोटी छोटी पावले उचलून सर्वसामान्य परिस्थितीकडे वाटचाल करण्यास सज्ज होणार आहे.

टीएसीने लाॅक डाऊन शिथिलीकरण अर्थात अनलाॅकींग प्रक्रियेसंदर्भात सरकारकडे सोमवारी सादर केलेल्या शिफारसीमध्ये सर्व दुकाने, मॉल्स आणि हॉटेल्स सुरवातीला 4 तास सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी सूचना मुख्यमंत्र्यांना केली आहे. तथापि प्रार्थनास्थळे स्विमिंग पूल आणि इतर गोष्टी जूनअखेरपर्यंत खुल्या केल्या जाऊ नयेत अशी शिफारस केली आहे.R ashok

मृतांचा आकडा आणि आढळून येणारे नवे रुग्ण लक्षात घेता कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लॉक डाउन एकदम हटविला जाऊ नये असे टीएसीने स्पष्ट केले आहे असे सांगून या संदर्भात आपली गृहमंत्री बसवराज बोम्मई आणि आरोग्यमंत्री आर. सुधाकर यांच्याशी तपशीलवार चर्चा झाल्याचे मंत्री आर अशोक यांनी सांगितले.

लॉक डाऊन शिथील केला जाईल, मात्र ही प्रक्रिया बहुधा 4 किंवा 5 टप्प्यात होईल. पहिला मुद्दा वेळेचा असेल, सध्या सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत लाॅक डाऊन शिथील केला जात आहे. हा कालावधी अनलॉकींगमध्ये वाढण्याची शक्यता आहे आणि उद्यानात फिरावयास जाणाऱ्यांना देखील बहुधा दिलासा मिळणार आहे. तथापि या सर्व गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर अवलंबून आहेत.

यासंदर्भात मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा येत्या एक-दोन दिवसात मंत्री, अधिकारी आणि तज्ञांची बैठक घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत चर्चा करून मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असे सांगून अनलॉकींग प्रसंगी आपल्याला पॉझिटिव्ह रुग्ण वाढणार नाहीत यावरही लक्ष ठेवावे लागेल, असे महसूल मंत्री आर. अशोक यांनी शेवटी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.