कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत असंघटीत कार्मिकांच्या 11 वर्गाना 2000 रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याकरिता कामगारानी कार्मिक सेवासिंधू पोर्टलवरील नमुन्याचा अर्ज भरून द्यावा असे आवाहन उप कार्मिक आयुक्त वेंकटेश अप्पया शिंदीहळ्ळी यानी केले आहे.
असंघटित कामगारांमध्ये धोबी, घरकामकरणारे,टेलर,मेकॅनिक ,हमाल,लोहार, सोनार, कुंभार, पोहा भट्टीत काम करणारे कामगार, न्हावी व कचरा गोळा करणारे हे सहाय्य धन घेण्यास पात्र आहेत.
सदर कार्मिक सेवासिंधू पोर्टलवरील विहीत नमुन्याचा अर्ज भरून त्या सोबत आधार कार्ड, रहिवासी दाखला ,मोबाईल क्रमांक, जन्म दाखला,बीपीएल कार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, आधार कार्ड सहित संलग्न बँक खात्याची माहिती, स्वयं घोषणापत्र व अर्जदाराचे व्यवसाय प्रमाणपत्र स्कॅन करून सेवासिंधू पोर्टलवर अपलोड करणे गरजेचे आहे.
व्यवसाय प्रमाणपत्राचा नमुना सेवासिंधू पोर्टलवर उपलब्ध असून सदर प्रमाणपत्र महसूल अधिकारी,महसूल निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य अधिकारी,आरोग्य निरीक्षक,
तहसिलदार, उप तहसिलदार, पंचायत विकास अधिकारी,पंचायत सचिव, पर्यावरण खात्यातील अधिकारी,कार्मिक खात्यातील अधिकारी किंवा कोणत्याही खात्यातील पत्रांकीत अधिकाऱ्यांच्या सहीनिशी सेवासिंधू पोर्टलवर अपलोड करायला हवे.