सगळीकडे कोरोनाचे संक्रमण वाढत असून अन्य व्याधिसाठी उपचार देखील मिळणे अवघड झाले आहे .
सरकारी रुग्णालयात चांगले उपचार मिळत नाहीत असाच गैरसमज आहे.पण खानापूर तालुक्यात सरकारी हॉस्पिटलमधे दहा कोविड महिलांच्या प्रसूती झाल्या आहेत.
विशेष म्हणजे जलंमलेली लहान बाळे कोविड निगेटीव्ह आहेत.अनाथाश्रमात असणाऱ्या दोन मुलांना कोरोना ची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बालरोगतज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. आरोग्य मंत्री डी सुधाकर आणि मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन खानापूरची ही मागणी पूर्ण करावी अशी मागणी आमदार निंबाळकर यांनी केली आहे.
सध्या या मुलावर खासगी डॉकटर उपचार करत आहेत.अशी माहिती खानापूर च्या आमदार अंजली निंबाळकर यांनी ट्विट करून दिली आहे.
सुरुवातीला खानापूर तालुक्यात कोविड हाहाकार होता कोणत्याच लोकप्रतिनिधीचे म्हणावे तेवढं लक्ष नव्हत मात्र गेल्या काही दिवसांपासून आमदार निंबाळकर यांनी हळूहळू का होईना कोरोना बाबत काम सुरू केलंय या कोरोनाच्या दशहतीत सरकारी इस्पितळात 10 कोविड पोजिटिव्ह महिलांची यशस्वी प्रसूती ती देखील बाळ निगेटिव्ह असणे ही दिलासादायक बाब आहे.
Proud to share we at Khanapur civil have done 10 Covid deliveries, both mother and babies fine.
All babies Covid negative.But @CMofKarnataka and @mla_sudhakar we need a Paediatrician to handle 2 positive 14yr old from orphanage.
At present Pvt. Dr is helping us. pic.twitter.com/P0y1PFSJcm— Dr. Anjali Nimbalkar (@DrAnjaliTai) June 4, 2021