प्रार्थमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने सर्व शिक्षकांना एसएसएलसी परीक्षेस सामोरे जाण्यापूर्वी लस देण्याचे ठरविले आहे. परंतु अनेक माध्यमिक शिक्षकांना वेळेत दोन्ही डोस न मिळण्याची भीती आहे. त्यामुळे परीक्षेच्या आधी सर्व शिक्षकाचे वेळेवर लसीकरण होणे गरजेचे आहे.
कोरोनाचा धोका ओळखून राज्य सरकारने 12 वी ची परीक्षा रद्द केली असून 10वीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, राज्यात एसएसएलसी, पी यु सी बोर्ड परीक्षा 2021 आयोजित करण्याचा अंतिम निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी बारावीची परीक्षा रद्द, दहावीची परीक्षा होणार असल्याचे सांगितले.
शुक्रवारी सकाळी10वाजता मंत्री शिक्षक मंत्री एस.सुरेश कुमार यांनी बैठक घेऊन एस एस एल सी आणि पीयूसी परीक्षेविषयी अंतिम निर्णय जाहीर केला.
तसेच शिक्षक मंत्री एस.सुरेश कुमार यांनी जाहीर केले की जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात एसएससी परीक्षा घेण्यात येणार. दहावीची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारावर होणार आहे.
एसएससी परीक्षेची तारीख ही परीक्षेपूर्वी 20 दिवस आधी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांना आत्तापासूनच लसीकरण करण्यास सुरुवात केली तरी सुद्धा दुसरा डोस
न मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षकांना लसीकरण पूर्ण होईल की नाही याची चिंता आहे.