Thursday, January 9, 2025

/

शिवसेनेच्या मागणीची पूर्तता

 belgaum

बेळगाव येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकातील धर्मवीर संभाजी महाराज मूर्ती परिसरातील सुशोभिकरणाचे काम मागील वर्षी 6 जूनला सुरवात झाली होती . येथील बांधकामाचे काम कोरोनाच्या महामारीच्या संकटामुळे आणि कंत्राटदारमुळे काम धिम्यागतीनं सुरू होते.

गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्तांची भेट घेत पाच जूनच्या आत काम सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्या नंतर सेना पदाधिकाऱ्यांनी आणि सुशोभीकरण समितीने आमदार अनिल बेनके यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर आमदारांनी त्वरित महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांना बोलावून खरडपट्टी केली होतीAnil benke

या प्रकरणी कंत्राटदारची चूक असल्यामुळे निधी वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे काम धिम्यागतीनं सुरू झालं होत यासंबंधी आमदार अनिल बेनके यांनी अधिकारी आणि कंत्राटदाराला सोमवार पासून काम करण्याचे आदेश दिले होते त्या नुसार सोमवारी पासून कामाची सुरुवात झाली.

यावेळी बुडा कार्यालयाचे व्ही एस हिरेमठ मनपाचे अभियंता सचिन कांबळे, कंत्राटदार, श्रीधर नागोजीचे, सुशोभीकरणस समितीचे अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष श्रीनाथ पवार,राहुल जाधव सरचिटणीस प्रसाद पवार, राजन जाधव, शिवसेनेचे बंडू केरवाडकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, यासह अन्य उपस्थित होते

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.