बिम्स मधील अनागोंदी कारभार अनेकांना मृत्यूचे कारण बनत आहे, अशा तक्रारी वारंवार करण्यात आल्या. हा कारभार सुरळीत व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बिम्सला भेट देऊन तेथील कारभाराविरोधात ताशेरे ओढले होते. त्यामुळे शुक्रवारी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी सुवर्ण विधानसौध येथे बैठक घेऊन बिम्स प्रशासनाच्या कारभाराला योग्य ती गती मिळावी यासाठी प्रादेशिक आयुक्त आदित्य अमलहान बिश्वास यांची नियुक्ती केली आहे.
त्यासंबंधीचे पत्रही पाठवून देण्यात आले आहे. आता प्रादेशिक आयुक्त बिम्स मधील कारभार सुरळीत करणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आदित्य अमलान बिश्वास हे एक प्रामाणिक अधिकारी असून यापुढे बिम्स वर नजर ठेवण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिम्स मधील गैरकारभार थोपवण्यासाठी व तेथील व्यवस्था रुळावर आणण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यामुळे आता आदित्य अमलान बिश्वास यांच्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. बिम्समध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी वाढत होत्या. त्यामुळेच तेथील वैद्यकीय संचालक विनय दास्तीकोप यांना दीर्घ मुदतीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यानंतरच राज्य सरकारने बिम्स प्रशासनावर नजर ठेवण्यासाठी आदित्य अमलान बिश्वास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बिम्समध्ये चाललेल्या गैरकारभार बरोबरच तेथील अधिकाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून यापुढे तरी येथील कारभार सुरळीत होणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
तर सर्वसामान्यांच्या तक्रारी कमी करण्यासाठी आदित्य अमलान बिश्वास काय करणार याकडेही सर्वांच्या नजरा लागून आहेत. आता त्यांनी गांभीर्याने याकडे लक्ष घालून तेथील कारभार सुरळीत करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.