बेळगाव जिल्हा रुग्णालय अर्थात बिम्स आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यातील वाद नित्य नियतीचे बनले आहेत.शनिवारी पुन्हा एकदा मयतांच्या नातेवाईक आणि बिम्स कर्मचाऱ्यांत जोरदार खंडाजगी उडाल्याचे जिल्हा इस्पितळा समोर दृश्य पहायला मिळाले.
बिम्स मध्ये हे भांडण जवळ एक तास हुन अधिक काळ चालले होते.सुरेश मेत्री वय 51 यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता त्यांचा मृतदेह मिळावा याबाबत हा वाद झाला होता.
याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार काकती येथील सुरेश मेत्री यांचे शुक्रवारी रात्री कोरोनाने निधन झाले होते अंतिम संस्कार करण्यासाठी मृतदेह देण्याची मागणी सुरेश यांच्या नातलगांनी केली होती त्या मागणीवर ते ठाम होते त्यावरून हा वाद निर्माण झाला होता. बिम्स कर्मचाऱ्यांनी मयत मृतदेहावर शल्य चिकित्सा करून अंतिम संस्कार करण्यासाठी मनपाकडे स्वाधीन करतो असे सांगितले त्यावरून दोन्ही गटात शाब्दिक चकमक होऊन वाद विकोपाला गेला होता.
बिम्स मध्ये रुग्णांना वेळेत जेवण दिले जात नाही डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मूळे हा बळी गेलाय असा आरोप मयताच्या नातेवाईकां कडून केला जात आहे.
दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला मात्र बिम्स मधील परिस्थिती अद्याप सुधारली नाही हे या घटनेवरून स्पष्ट झालं आहे.रुग्णांचे नातेवाईक बिम्स मधील सुविधा आणि उपचारा वर अद्याप नाराज आहेत हे दिसून येत आहे.