द्वितीय पी यु सी परीक्षेचा निकाल देण्याची सूचना केलेल्या राज्याचे शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी बारावीच्या निकालावर पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना केली आहे.
एस एस एल सी आणि पी यु सी प्रथम वर्षाच्या निकालाच्या आधारावर ग्रेडिंग पद्धतीनं निकाल द्यावा अश्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
शिक्षण मंत्री दररोज दहावी आणि बारावी बाबत परीक्षा असो किंवा निकाल असोत कोविड काळात कश्या पद्धतीनं घेतल्या जातील यावर वेळोवेळी मार्गदर्शक सूची,घोषणा जाहीर करत आहेत.
2020-21 वर्षीच्या पी यु सी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकालाची घोषणा करण्यासाठी पी यु सी प्रथम वर्षात मिळवलेले गुण, आणि एस एस एल सी परीक्षेत मिळवलेले गुण मिळून मार्गदर्शक सूची नुसार निकाल द्यावा असे देखील शिक्षण मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले आहे.
मात्र व्यावसायिक कोर्स करीत पियुसी द्वितीय परीक्षेचे मार्क्स ग्राह्य धरले जाणार नाहीत केवळ सी ई टी चा स्कोर यासाठी ग्राह्य मानला जावा अशी मागणी उच्च शिक्षण मंत्री अश्वथ नारायण यांनी केली आहे.