दोन दिवसापूर्वी कडोली गावात एका तरुणाचा अक्सिजन विना मृत्यू झाला आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी कडोली प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोर्चा काढला व तेथील कारभारा विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. सरकारने प्रत्येक आरोग्य केंद्रात ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध केली असताना कडोली प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र ऑक्सिजनचा पुरवठा नाही.
त्यामुळे एका तरुणाचा विनाकारण मृत्यू झाला आहे. तेव्हा येथील व्यवस्था सुधारा व ऑक्सिजन व इतर सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.
त्याच बरोबर कडोली ग्रामपंचायत वर देखील मोर्चा काढून संताप व्यक्त करण्यात आला. कडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव आहे. येथील कर्मचारी तपास करण्यापूर्वीच औषधी गोळ्या देऊन बाहेरच्या बाहेर रुग्णांना पाठवत आहे.
त्यामुळे सोडलं की पळतय आणि धरलं की चावतय अशी अवस्था येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची झाली आहे. मात्र याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून येथील सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.