रामलिंग खिंड गल्ली येथील यशस्वीनी उद्योजक संस्थेने बेळगाव महापालिकेच्या निर्जंतुकीकरण मोहिमेसाठी 1000 लिटर सोडियम हायपोक्लोराईट सोल्युशन दिल्याबद्दल महापालिकेने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
कोरोना प्रादुर्भावाला थोपविण्यासाठी आम्ही उपाय योजनांबरोबरच बेळगाव महापालिकेकडून परिसर निर्जंतुकीकरणाची मोहीम देखील राबविले जात आहे.
या मोहिमेला हातभार लावून आपली सामाजिक बांधिलकी जपतांना रामलिंग खिंड गल्ली येथील यशस्वीनी उद्योजक संस्थेने महापालिकेला 1000 लिटर सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशन थेट जंतुनाशक द्रावण देणगीदाखल दिले आहे.
याबद्दल महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी महापालिकेतर्फे कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र आज यशस्वी उद्योजक संस्थेचे अध्यक्ष कुमार कोटुर व उपाध्यक्ष शिल्पा केकरे यांच्याकडे सुपूर्द केले. याप्रसंगी शीतल मुंदडा यांच्यासह संस्थेचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. संजय डुमगोळ यांनी सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशन देऊन महापालिकेच्या निर्जंतुकीकरण मोहिमेला हातभार लावल्याबद्दल यशस्वीनी उद्योजक संस्थेला धन्यवाद दिले.
त्याचप्रमाणे सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात परिसर स्वच्छ ठेवणे ही फक्त सरकारची जबाबदारी नसून जनतेनेही या कामी पुढाकार घेतला पाहिजे. त्याप्रमाणे कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असे सांगितले.