बेळगाव शहर परिसरात नाल्या जवळची अतिक्रमणे हटवून नाले सफाई झाली तरच शहरातील घरांतून पावसाचे पाणी जाणे थांबणार आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी आधी नाल्यावरची अतिक्रमणे हटवावी मग नाले सफाई करावे अश्या सक्त सूचना आमदार अनिल बेनके यांनी मनपा आयुक्त के एच जगदीश यांना दिल्या आहेत.
शनिवारी सकाळी मनपा आयुक्त के एच जगदीश आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी पूर आलेल्या बळळारी नाल्याची पाहणी केली.गेल्या आठवड्या पासून मुसळधार पाऊस झाल्यामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दूबार पेरणीचे संकट देखील निर्माण झाले आहे.
या मुसळधार पावसामुळे अनेक शेतक-यांचे शेतीचे बांध फोडून नाल्याचे पाणी थेट शेतात घुसल्याने नुकतेच शेतात मशागत करून भात रोपे तयार करण्यासाठी भाताची पेरणी केली होती ती भात रोपे देखील वाहून गेली आहेत तर काही शेतात वाहून आलेल्या मातीचे ढिगारे तयार झाले आहेत.यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता पुन्हा केव्हा शेताची दुरुस्ती करणार आणि नंतर केव्हा दुबार पेरणी करणार अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.
यावेळी अनिल बेनके म्हणाले, जोपर्यंत हे नाले स्वच्छ होत नाहीत तो पर्यंत घराघरांत पावसाचे पाणी येत राहणार यासाठी मी गेल्यावर्षी पासून हे नाले स्वच्छ करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत, आणि ते काम करत आहेत, पण मागील चार महिन्यात निवडणूकीमुळे आचारसंहिता व कोरोनामुळे अधिकाऱ्यांची धावपळ यांमुळे यावर्षी कुडची रोडवरील नाला ते मुचंडी पर्यंत नाला सफाई जो पर्यंत स्वछ होत नाही तो पर्यंत ही समस्या राहणार ही समस्या सोडवण्यासाठी मी पुढील वर्षी प्रयत्न करणार, साध्य जेसीबीच्या साह्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
यावेळी महानगरपालिकाचे आयुक्त जगदीश, मंजुश्री सचिन कांबळे,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, तालुकाध्यक्ष सुनील जाधव, श्रीधर पद्धमणवर,अरुण पुजारी,सुनील खनुकर,उत्तम नाकाडी, आप्पा मंडोळकर, महेश बडमनजी, कृष्णा पिंगट, राहुल मोरे, पुंडलिक मोरे, आप्पारव भोसले,महेश खतेकर,सुनील अनगोळकर यासह शेतकरी अन्य उपस्थित होते.