सुरुवातीला कोरोना लसीकरणाच्या बाबतीत म्हणावी तेवढी जनजागृती झाली नव्हती लोकं देखील लस घेण्यासाठी कचरत होते मात्र लसीकरण केंद्रात गर्दी होत असल्याने आता अनेक केंद्रामधून लस उपलब्ध होताना दिसत नाही आहे
शनिवार बेळगाव जिल्ह्यात लस आऊट ऑफ स्टॉक झाली आहे को वॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लस उपलब्ध नाहीत त्यामुळे वॅक्सिन घेण्यासाठी जाऊन अनेक खाली परतल्याची दृश्ये सामान्य झाली आहेत लस आऊट ऑफ स्टॉक झाल्याने जिल्ह्यात लसीकरण बंद आहे.
जिल्हा रुग्णालय बिम्स असो किंवा तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रे असोत आज रविवारी सर्वत्र लसीकरण बंद आहे अनेकांनी लस घेण्याचे ठरवले होते त्यांना आपला प्लॅन बदलावा लागलेला आहे कारण जिल्ह्यातील 150 लसीकरण केंद्र आज बंद आहेत.
बिम्स जवळील लसीकरण केंद्रात नो वॅक्सिंन असा फलक लावण्यात आला आहे लसीकरण करून घ्यायला आलेले फलक पाहून परतत आहेत लसुण मिळाल्याने सरकार विरोधात अनेकजन राग व्यक्त करताना दिसत आहेत.
कोरोनाची तिसरी लाट यायची शक्यता असताना देखील लस उपलब्ध होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात असून खाजगी आणि सरकारी इस्पितळात देखील लस नो स्टॉक झाली आहे अनेक खाजगी इस्पितळात 780 रुपये लसीची किंमत आहे ती देखील खाली झाली आहे.
अनेकांनी पैसे देऊन लस घ्यायची तयारी दर्शवली होती मात्र अश्याना देखील लस मिळाली नाही.सोमवारी बेळगावला लस यायची शक्यता आहे.त्यानंतर पुन्हा बेळगावात लसीकरण मोहीम जोर धरणार आहे.