अनलॉकिंगमुळे राज्यातील निर्बंध शिथिल केले जात असून आता येत्या सोमवार दि. 28 जूनपासून विवाह सोहळे रिसॉर्ट अथवा मंगल कार्यालयांमध्ये पूर्वीच्याच अटीनुसार आयोजित करण्यास परवानगी असल्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी घोषित केले आहे.
बेंगलोर येथे आज झालेल्या प्रशासकीय बैठकीनंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली आहे. येत्या सोमवारपासून रिसॉर्ट किंवा मंगल कार्यालयांमध्ये विवाह सोहळे आयोजित करण्यास परवानगी असली तरी विवाहासाठी तहसीलदारांच्या परवानगीसह जास्तीत जास्त 40 माणसे आणि फेस मास्कची सक्ती हे नियम पाळावे लागणार आहेत.
यापूर्वी निश्चित केलेले विवाह सोहळे आपापल्या घरी साध्या पद्धतीने 40 निकटवर्तीयांच्या उपस्थित कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून पार पाडण्यास परवानगी होती.
आता देखील हे सर्व नियम कायम असले तरी नागरिकांना आपल्या सोयीनुसार रिसॉर्ट किंवा मंगल कार्यालयामध्ये विवाह आयोजित करता येणार आहेत. यासंदर्भातील अधिकृत आदेश अद्याप जारी झालेला नाही.