सद्याच्या काळात वाढदिवस अनेक जण वेगवेगळ्या पध्दतीने साजरा करण्याची पध्दत सुरू झाली आहे. मग तो लग्नाचा असो वा जन्मदिवसाचा…
पण मजगाव येथील काकतकर कुटूंबाने एक वेगळ्या पद्धतीने लग्नाचा वाढदिवस साजरा केला. माजी प्राध्यापक अप्पय्या काकतकर आणि शिक्षिका सौ जयश्री काकतकर यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने साजरा केला. आणि समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.
शनिवारी काकतकर दाम्पत्याने 34 वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने त्यांनी आपल्या भागातील नातेवाईक आणि हितचिंतकांना औषधी झाडे तसेच निसर्गात शुध्द हवा निर्माण करणारी जातीवंत झाडांची रोपे वाटली. पिंपळ वड तसेच अनेक औषधी गुणधर्म असलेली फुलांची रोपे यावेळी त्यांनी वाटली.
कोरोना काळात ऑक्सिजन अभावी अनेक जणांचा बळी गेलाय हवेत योग्य प्रकारे शुध्द ऑक्सिजन निर्मिती होत नाही त्यासाठी ऑक्सिजन निर्माण करणारी झाडे लावली पाहिजे तरच हवेत योग्य ऑक्सिजन निर्माण होईल व आपल्याला योग्य आणि शुध्द हवा मिळू शकेल या उद्देशाने झाडं लावण्यासाठी त्यांनी रोपे वितरित केली.
आपले शरीर निरोगी राहण्यासाठी नियमित योगा करणे, दररोज किमान एक दोन किलोमीटर चालणे, पोष्टिक आहार घेणे, यामुळे आपले शरीर निरोगी होईल. यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती काकतकर परीवाराकडून यावेळी सांगण्यात आली.
यावेळी प्रत्येकांने आपल्या वाढदिवसाला एकतरी झाड लावावे आणि त्याचे संगोपन करून त्याला वाढवावे जेणेकरून निसर्गाकडून आपल्याला चांगले आरोग्य लाभेल असाही संदेश त्यांनी दिला.
या कार्यक्रमाचे आयोजन अप्पय्या काकतकर यांचे चिरंजीव पवन काकतकर चरण काकतकर सुना रश्मी काकतकर अक्षता काकतकर नातु ऱ्हीदन काकतकर यांनी केले होते. यावेळी प्रसाद काकतकर अनिल कुट्रे रमेश सांबरेकर भ्रमा मजुकर बाळासाहेब मजुकर मयुरी मुदलीयार रेणुका पट्टण लक्ष्मी मासेकर शांता मजुकर गीता कुट्रे कांचन सांबरेकर सरोज पाटील भारती मजुकर अंकीता मजुकर व गल्लीत नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.