मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावतर्फे येत्या दि. 9 आणि 10 ऑगस्ट 2021 रोजी सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लार्क या पदांकरिता माजी सैनिकांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी फक्त मराठा लाईट इन्फंट्रीचे माजी सैनिकच पात्र असणार आहेत.
सदर भरतीसाठी पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत. भरती मेळाव्यास इच्छुक उमेदवारांनी मराठा लाईट इन्फंट्री मध्येच सेवा बजावलेली असावी. मागील सेवेतून मुक्त होताना चारित्र्य मूल्यांकनात ‘आदर्शवत’ किंवा ‘अतिशय उत्तम’ हा शेरा मिळालेला असावा. उमेदवाराला त्याच्या मागील संपूर्ण सेवाकाळात दोन पेक्षा अधिक वेळा लाल शेरा मिळाला नसावा. सक्रिय सेवेत असताना लष्करी कायद्याच्या कलम 34, 35, 36, 37 आणि 41 (2) अन्वये शिक्षा झालेली नसावी. मागील सेवेच्या शेवटच्या 5 वर्षात एक्स्ट्रा गार्ड आणि ड्युटीमध्ये लष्करी कायद्याच्या कलम 48 अन्वये दंडा दाखल लाल किंवा काळा शेरा मिळालेला नसावा. मागील सेवा काळाच्या शेवटच्या 3 वर्षात लाल शेरा मिळालेला नसावा.
उमेदवाराने आपल्या मागील सेवा काळात किमान 5 वर्षे तिरंग्याची सेवा केलेली असावी. पुनर्रभरतीची तारीख मागील सेवेतून निवृत्त झालेल्या तारखेच्या दोन वर्षा आतील असावी. वैद्यकीय श्रेणी शेप 4 असावी. मागील सेवानिवृत्तीचे कारण सेवा कराराची पूर्तता झालेली असणे किंवा स्वेच्छानिवृत्ती हे असले पाहिजे. शैक्षणिक पात्रता मॅट्रिक आणि त्यावरील किंवा नॉनमॅट्रिक एसीई -lll असावी. सोल्जर जीडी पदासाठी उमेदवाराचे वय 46 वर्षापेक्षा कमी आणि सोल्जर क्लार्क पदासाठी 48 वर्षापेक्षा कमी असले पाहिजे.
भरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. ओरिजनल डिस्चार्ज बुक, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला/ ट्रान्सफर सर्टिफिकेट/ असेल तर बोनाफाईड सर्टिफिकेट, राज्यशासनाचे जाती प्रमाणपत्र, अधिकृत रहिवासी दाखला, गावचे सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या स्वाक्षरीसह अधिकृत शिक्का असलेले कॅरेक्टर सर्टिफिकेट (चारित्र्य प्रमाणपत्र). कुटुंबातील सदस्यांचे एकत्रित छायाचित्र, सोबत त्या सदस्यांची नांवे, त्यांच्याशी असलेले नाते आणि प्रत्येकाची जन्मतारीख हा तपशील जोडलेला असावा.
आर्मी ग्रुप इन्शुरन्स सर्टिफिकेट, सर्व मूळ प्रमाणपत्राच्या फोटो स्टेट कॉपीजचे दोन संच, अलिकडे काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या 12 प्रति, जिल्हा पोलीस प्रमुखांनी पडताळणी केल्याचे त्यांच्या स्वाक्षरीचे व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट. या सर्व गोष्टींसह इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी बेळगाव मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8 वाजता हजर राहावयाचे आहे.