कर्नाटक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य मंत्रिमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्यातील सगळ्या महानगरपालिका,नगर पंचायत,आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.त्यामुळे आता बेळगाव मनपा निवडणुका आता आणखी सहा महिने लांबणीवर पडल्या आहेत.
सर्वच निवडणुका सहा महिने या निवडणुका पुढे ढकलण्यावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे.राज्यातील जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि अध्यक्ष,उपाध्यक्ष यांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्यात आल्याचा आदेश नगरविकास खात्याचे सचिव प्रसाद यांनी काढला आहे.