अल्पावधीतचं खानापूर युवा समितीने विश्वास निर्माण केला असून त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळताना दिसत आहे.
युवा समितीने केलेल्या मागणीला यश मिळाले असून लैला सुगर्स तर्फे शेतकऱ्यांची थकीत बिले देण्यास सुरुवात करण्यात आली असून दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर 80 लाख रुपयांची बिले जमा करण्यात आली आहे तर येत्या दोन दिवसात चार कोटींची बिले दिली जातील अशी माहिती युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना कारखाना व्यवस्थापनातर्फे देण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यापासून पाठवण्यात आलेल्या ऊस गेले गेल्या सहा महिन्यापासून देण्यास लैला शुगर सून टाळाटाळ करण्यात येत होती याची माहिती मिळताच काही दिवसांपूर्वी युवा समितीच्या पदाधिकारी जाऊन कारखान्याचे व्यवस्थापन व्यवस्थापन अधिकारी सदानंद पाटील यांना जाऊन जाब विचारला होता तसेच गेले वेळेत जमा न केल्यास कारखान्यासमोर शेतकऱ्यांचा मोर्चा करून आंदोलन करण्याचा इशारा समितीतर्फे देण्यात आला होता त्यानंतर ही मिले आज जमा करतो उद्या जमा करतो असे सांगून बिले देण्यास टाळाटाळ केली जात होती त्यामुळे आठ दिवसापूर्वी जाऊन पदाधिकाऱ्यांनी पुन्हा दिले द्यावी अशी मागणी केली होती
मात्र कारखाना व्यवस्थापनाकडून कोणतीच माहिती देण्यात आली नाही त्यामुळे बुधवारी पुन्हा कारखाना वर जाऊन पदाधिकाऱ्यांनी बिले कधी जमा करणार असा प्रश्न उपस्थित केला त्यावेळी व्यवस्थापकीय संचालक पाटील यांनी कोरोनामुळे बिल देण्यास विलंब झाला होता मात्र दोन दिवसापूर्वी 80 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून दोन दिवसात इतर शेतकऱ्यांना ही बिले दिली जाणार आहेत अशी माहिती दिली.
*शेतकऱ्यांची बिल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने जाऊन बिले देण्याची मागणी केली होती सुरुवातीला लॉक डाऊन आणि इतर कारणे देत मिले घेण्यास विलंब झाला याची माहिती देण्यात आली होती मात्र गुरुवारी कारखान्याने दिले जमा करण्यास सुरुवात झाली अशी माहिती दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे उर्वरित शेतकऱ्यांची लवकर बिल द्यावी.
धनंजय पाटील, अध्यक्ष युवा समिती,खानापूर तालुका*
यावेळी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सचिव सदाशिव पाटील, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील, परशराम गोरे, राहुल पाटील, सहदेव हेब्बाळकर आदी यावेळी उपस्थित होते.