बेळगाव जिल्हात सर्वत्र पावसाने हजेरी लावली असून
काही ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या 18 तासात बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकस्कोप धरणाची पाणीपातळी सव्वा तीन फुटाने वाढली आहे.
राकस्कोप आजूबाजूच्या पाणथळ प्रदेशात जोरदार पाऊस पडल्याने या काळात मोठ्या प्रमाणात पाणी धरणात जमा झाले आहे.
या वर्षी पाण्याची कमतरता शहरवाशियाना भासली नसली तरी राकस्कोप धरणाच्या पाणी पातळीत खुप कमी आली होती. मात्र, प्रत्यक्षात राकस्कोप धरणात बुधवारी रात्री १२ वाजता नवीन पाणी दाखल झाले.
गुरुवारी सकाळी धरणातील पाण्याची पातळी 2457.50 इतकी झाली असुन गत वर्षी आजच्या दिवशी 2554.80 इतकी होती.तर तीन दिवसाच्या पावसाने सव्वा तीन फुटानी वाढली असल्याची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या पाणी साठ्याची पातळी
ओलांडली आहे.
या परिसरात आता पर्यंत 110.9 मी मी पाऊस झाला असल्याची नोंद झाली आहे.