बेळळारी नाल्याच्या दरवर्षी उदभवणाऱ्या पुराच्या समस्येवर तोडगा कायमस्वरूपी काढण्यात येणार आहे.या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आठशे कोटी रु चा प्रस्ताव सरकारकडे सादर केल्याची माहिती बेळगावचे पालक मंत्री गोविंद कार्जोळ यांनी बेळगावात दिली.
गेल्या कित्येक वर्षांपासून तर नाल्याच्या काठावरील हजारो एकर जमीन पाण्याखाली जावून शेतकऱ्यांना सलग अनेक वर्षे आर्थिक फटका बसत आहे.काही दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे तर नाल्याच्या परिसरातील शेती जमिनींना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
शेतकरी अनेक वर्षापासून नाल्यातील गाळ काढण्याची मागणी करत आहेत.पण त्याकडे लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी केवळ दुर्लक्ष केले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक फटका बसत आहे.याची दखल घेवून पालकमंत्र्यांनी आठशे कोटी रु चा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे.
हा प्रस्ताव सरकारकडून मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही देखील पालकमंत्र्यांनी दिली आहे.
दरम्यान बेळगाव दौऱ्यावर असलेले पालकमंत्री गोविंद कारजोळ हे बळळारी नाल्याची पहाणी करायला येणार अशी माहिती मिळाल्याने शेतकरी मंत्र्यांच्या प्रतीक्षेत ताटकळत बसले होते तिकडे पालकमंत्री कारजोळ यांनी बळळारी नाल्यासाठी 800 कोटीचा प्रस्ताव सरकारकडे दिल्याची माहिती दिली