Thursday, January 9, 2025

/

या सहा डॉक्टरांचा होणार जायंट्स तर्फे गौरव

 belgaum

सगळीकडे एक जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी जायंट्स मेनच्या वतीने डॉक्टरांना सन्मानित करण्यात येते.
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगावर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असताना डॉक्टरांची भूमिका खूप महत्त्वाची होती.
यावेळी जायंट्स मेनने कोरोना काळात रुग्णांची सेवा केलेल्या डॉक्टरांचा गौरव करण्याचे ठरविले असून समर्थ नगर येथील प्रकाश राजगोळकर, शहापूर येथील डॉ संजय आढाव, काकतीवेस येथील मधुसूदन मुरकुटे, लाईफकेअर हॉस्पिटलचे डॉ शैलेंद्र मुतगेकर, उचगावचे डॉ वामन चोपडे, डॉ झिशानअली जमादार यांना गौरविण्यात येणार आहे.

उद्या सायंकाळी साडेचार वाजता तुकाराम बँकेच्या अर्जुनराव दळवी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास हे विवा फार्माचे श्री हर्षवर्धन इंचल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.

प्रकाश राजगोळकर हे बीएचएमएस असून ते समर्थ नगर येथे आपली सेवा बजावत आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून डेंग्यू चिकनगुणियावर बेळगाव तालुक्यातील खेड्यामध्ये मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करत आले आहेत. कोव्हिड रुग्णावर उपचार करत असताना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार द्यायचे काम डॉ राजगोळकर यांनी केले आहे.

Doctrs
संजय आढाव हे बीएचएमएस असून त्यांनी अनेक मेडिकल कॅम्पस् आयोजित केले असून कोव्हिड काळात त्यांनी रुग्णांना सेवा दिली आहे.
मधुसूधन मुरकुटे हे बीडीएस असून ते दंतवैद्य म्हणून काम करतात. त्यांनी इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष असताना अनेक डेंटल मेडिकल कॅम्प आयोजित केले होते.
डॉ शैलेंद्र मुतगेकर हे लाईफ केअर हॉस्पिटलचे संचालक असून त्यांनी मुंबई, गोवा आणि बेळगाव या ठिकाणी आपली सेवा बजावली आहे. गरीब गरजूंसाठी त्यांनी विशेष कार्य केले आहे. त्यांनी अनेक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या असून गेल्या वर्षीपासून आजतागायत दहा हजाराहून अधिक कोव्हिड रुग्णांवर उपचार केले आहेत.
डॉ वामन चोपडे हे बीएचएमएस असून गेल्या पंचवीस वर्षांपासून उचगाव सारख्या ग्रामीण भागात गोरगरिबांना आपली सेवा देत आहेत. कोव्हिड रुग्णांसाठी ते चोवीस तास उपलब्ध आहेत.
डॉ झिशान जमादार हे डेक्कन हॉस्पिटलमध्ये आपली सेवा देत असून कोव्हिड रुग्णांचे देवदूत म्हणून त्यांनी कार्य केले आहे. अगदी तरुण वयात रात्रंदिवस कोव्हिड रुग्णांची सेवा केल्याने ते रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे अगदी आवडते डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत.

 belgaum

1 COMMENT

  1. छान अतिसुंदर ,?
    अश्या डॉक्टरांचा गौरव करण्याची गरज आहे,
    मी स्वतः उचगाव चा असल्याने मला डॉक्टर वामन चोपडे परिचयाचे आहेत.
    विशेष म्हणजे त्यांनी दीड वर्षात कधीच ना सुट्टी घेतली ना परिस्थितीचा गैर फायदा घेतला.
    समस्त डॉक्टरांचे मनःपूर्वक धन्यवाद,?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.