कुमारस्वामी ले आऊट मधील कोविड केंद्रातून कोरोनाशी लढून बरे झालेल्या सात व्यक्तींना जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनी फुलांची रोपे देवून कोविड केंद्रातून घरी जाताना शुभेच्छा दिल्या.
कोविड रुग्णांना सरकारच्या मार्गदर्शक सुचीनुसार उपचार करून उत्तम आहार त्यांना केंद्रात देण्यात येत होता.रुग्णांना केंद्रामध्ये उत्तम औषधोपचार देण्यात येत आहेत.त्यामुळे बाधा झालेल्या व्यक्तींनी घाबरु नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.
पोलीस उपायुक्त डॉ.विक्रम आमटे,मनपा आयुक्त के.एच.जगदीश,आरोग्याधिकारी डॉ.एस. व्हि. मून्याळ,डॉ.संजय दुमगोळ उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी वॉर्ड क्र.53 आणि 54 मधील घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांशी घराबाहेरून संवाद साधला.घरी औषधे पोचविण्यात येत आहेत.
डॉकटर दररोज सूचना करत आहेत.त्या बरोबर उत्तम आहार रुग्णांनी घ्यावा असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कंग्राळी बी के आणि हिंडलगा येथे रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने तेथेही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देवून तो परिसर सील करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना केली.