करोना संकटाचा सगळ्याच सण-उत्सवांना फटका बसला असून यंदाचा शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी उद्यानात उद्या निवडक शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रविवारी शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातून निवडक कार्यकर्तेच्या उपस्थित होणार आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी उद्यानात न येता घरातच शिवराज्याभिषेक दिन साजरा करावा, असे आवाहन शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी केले आहे.
दरवर्षी बेळगावात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. बेळगावातून मोठ्या संख्येने शिवभक्त शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला उपस्थित राहतात. पण यावेळी करोना साथीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी उद्यानात हा दिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यासाठी सुनील जाधव, राजू शेट्टी,आदित्य पाटील, प्रोमोद कंग्राळकर , गौरांग गेंजी,यांच्यासह निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा समारंभ केला जाणार आहे.
‘शिवराज्याभिषेक घरीच साजरा करा’
दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवराज्याभिषेक दिन शिवभक्तांनी घरात राहूनच विविध उपक्रमांनी साजरा करावा. घरासमोर स्वराज्याचा भगवा ध्वज लावावा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करावे, स्वदेशी जातीचे एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी उद्यानात येण्याचा प्रयत्न करू नये,’ असे आवाहन सुनिल जाधव यांनी शुक्रवारी केले होते.
मध्यवर्ती शिवजयंती मंडळाचे आवाहन
मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री.दिपक दळवी यांनी केले शिवप्रेमींना आवाहन
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव व परिसरात तीन दिवसांचा कडक लॉकडाऊन असल्याने ६ जून रोजी होणारा शिवराज्याभिषेक दिन सार्वजनिकरीत्या मोठ्या उत्साहात साजरा करता येणार नाही, तरी शिवप्रेमींनी आपल्या घरीच शिवप्रतिमा किंवा शिवमूर्तीचे पूजन करून शिवराज्याभिषेक साजरा करावा, असे आवाहन व विनंती समस्त शिवप्रेमी जनतेला मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ व मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी यांनी केले आहे