कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रावर संकट आले आहे. बेळगावात मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. मात्र आलेल्या संकटाला थोपवण्यासाठी चित्ररथ महा मंडळ सुनील जाधव आणि मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ मंडळाच्यावतीने घरोघरी शिवजयंती साजरी करावे असे आव्हान मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले होते. त्याप्रमाणे प्रत्येक जण आपापल्या घरीच शिवजयंती राज्याभिषेक सोहळा साजरा करत आहेत.
वाढती कोरोनाची रुग्ण संख्या यामुळे अनेक सण-उत्सव समारंभावर निर्बंध लागले आहेत. बेळगाव येथील शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतो. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे हा राज्याभिषेक सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. यावर्षीही राज्याभिषेक सोहळा घराघरात साजरा करण्याचे आव्हान करण्यात आले होते. त्याप्रमाणे संपूर्ण शहर आणि तालुक्यात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
चित्ररथ महामंडळाच्या वतीने केलेल्या आवाहनाला नुसार प्रत्येक शिवभक्तांनी आपल्या घरी शिवराज्याभिषेक दिन साजरा केलेला आहे.
आपल्या घरामध्ये शिवमुर्ती असुदे किंवा शिवप्रतिमेचे पूजन करत शिवराज्याभिषेक दिन साजरा केला.शिव संत संजय मोरे यांनी आपल्या घरी प्रतिमेचे पूजन केले.मराठी बांधवांनी आपल्या घरीच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अनेक युवकांनी ऑनलाइन पद्धतीने सोशल मीडियावर देखील शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केलाय.व्हाट्स अप फेसबुक वर प्रोफाइल आणि डी पी वर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवत हा क्षण साजरा केलाय.