कोरोनाच्या म्युटेशन झालेल्या डेल्टा प्लस या व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. त्याचा शिरकाव कर्नाटकात होऊ नये, यासाठी कर्नाटकने बेळगावातून कोल्हापूर आणि साताराकडे जाणारी बससेवा आज सोमवारपासून बंद केली आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा व अन्य कांही जिल्ह्यात कोरोनाचा रूपांतरित डेल्टा प्लस या व्हायरसने कहर केला आहे. त्याशिवाय या राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोकाही वाढला आहे.
त्यामुळे वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने खबरदारी घेतली आहे. मंडळाने कोल्हापूर व सातारा जिल्ह्याची बस सेवा बंद केली आहे.
महाराष्ट्र सरकारने देखील कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हायरस या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे वायव्य कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने त्या ठिकाणची आपली बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे