गोव्याहुन बेळगाव कडे बेकायदेशीर रित्या आणली जाणारी गोवा बनावटीची दारू मोठया प्रमाणात जप्त करण्यात आली आहे.
बेळगावच्या सीसीबी पोलिसांनी गोवा बनावटीच्या 1920 बॉटल व वापरण्यात येणारी एक कॅनटर गाडी असे एकूण 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
1920 गोवा बनावटीच्या दारू बाटल्या असून प्रत्येक बाटलीत 750 मिली दारू आहे. या प्रकरणी सिध्दारूढ पत्रार रा.कणबर्गी यांना अटक केली असून या प्रकरणी काकती पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
सी सी बी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संजीव कांबळे आदी सहकाऱ्यांनी होनगा जवळील रसोई हॉटेलजवळ कॅनटर गाडी वर धाड टाकत ही कारवाई केली आहे.
या गाडीतून 1920 गोवा बनावट दारुच्या बाटल्या बेकायदेशीर रित्या आणल्या जात होत्या. सदर दारू पकडलेल्या सी सी पोलिसांचे अभिनंदन पोलीस आयुक्त त्यागराज आणि उपायुक्त विक्रम आमटे यांनी केलं आहे.