बेळगाव शहर पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी शाखेने (एएचटीयु) अन्य खात्यांच्या मदतीने शहरात ठीकठिकाणी मोहीम राबवून 8 महिला आणि 5 अल्पवयीन मुलांची रस्त्यावर भीक मागण्याच्या धंद्यातून मुक्तता केली.
रस्त्यावर भीक मागत फिरणाऱ्या दुर्लक्षित व निराधार महिला आणि अल्पवयीन मुलांच्या हितासाठी बेळगाव पोलिसांकडून अशी मोहीम वरचेवर राबविली जाते.
त्यानुसार शहर पोलिसांच्या एएचटीयु शाखेने बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण केंद्र (डीसीपीयु), चाइल्ड हेल्पलाईन -1098, कामगार खाते आणि बाल कामगार प्रकल्प यांच्या सहकार्याने
आज बुधवारी शहरातील कित्तूर चन्नम्मा सर्कल, बसस्थानक, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी खास मोहीम राबवून दुर्लक्षित निराधार अशा 8 महिला व 5 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. तसेच त्यांना बाल कल्याण समितीकडे सुपूर्द केले आहे.
सदर मोहिमेत एएचटीयु शाखेचे एएसआय बी. एन. हिरेमठ, डब्ल्यूएएसआय एल. बी. पुरानिक, एएसआय एम. व्ही. कुरूवट्टीमठ, एएसआय आर. वाय. भोसले, दरूर, अनिता बोमन्नावर, डब्ल्यूपीसी डी. व्ही. मुंगरवाडी आणि राजश्री गिड्डूर यांचा समावेश होता.