दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि शांताई वृद्धाश्रम चा अभिनव उपक्रम अनेकांना लाभदायक -कोरोना महामारीमुळे बरेच जण संकटात आले आहेत. अशा गरीब व गरजूंना मदत करण्यासाठी शांताई वृद्धाश्रम यांनी रुग्णवाहिका दक्षिणकाशी कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टला दिली.
या दोघांच्या प्रयत्नातून अनेकांचे जीव वाचले आहेत. महत्त्वाचे म्हणजे दक्षिण काशी कपलेश्वर देवस्थान ट्रस्ट मंडळाने यासाठी अधिक आटापिटा करून नागरिकांचा जीव कसा वाचवता येईल याकडे लक्ष दऊन या कामाचे सार्थक केले आहे.
दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थानच्या ट्रस्टच्यावतीने वतीने कोरोना काळामध्ये मोफत रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली होती. प्रामुख्याने बेळगाव शहरामध्ये कोरोनाचे वाढती रुग्ण संख्या पाहून इतर सामाजिक संस्थांनी कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका तयार ठेवल्या होत्या पण इतर आजार प्रामुख्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार, डायलेसिस, पॅरॅलिसिस, गरोदर स्त्रिया, आर्थोपेडिक आजार, असे 157 रुग्णांची गैरसोय टाळण्यात आली.
प्रमुख्याने पॅरॅलिसिस पेशंटसाठी नागरमुन्नोळी, मुरगोड, संगोळी, या भागामध्ये बेळगाव तालुक्यातील रुग्णांना मोफत ने-आण करण्यात आली. देवस्थान ट्रस्टच्या वतीने ऑक्सिजनची सोय तसेच गरीब लोकांना धान्य वाटप व देखील करण्यात आले. कोरोना रुग्णांवर अंतिम संस्कार देखील कोरोना नियमावलीनुसार करण्यात आले.
मंदिराचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा करण्यात येत आहे. यासाठी मंदिराचे ट्रस्टी चालक म्हणून काम करत आहेत. यामध्ये अभिजित चव्हाण, राजू भातकांडे, विवेक पाटील, राहुल कुरणे, मंदिरातील सेवेकरी सचिन आनंदाचे, गणेश देवर, दौलत जाधव या सर्वांच्या सहकार्यामुळे ही सेवा सुरू आहे.
याचबरोबर अजूनही गरीब गरजूंसाठी त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत त्यांच्या प्रयत्नांचे श्रेय संबंधित ट्रस्टला जात आहे याचबरोबर ज्यांनी रुग्णवाहिका मदत केली, त्यांचे ही यावेळी अनेकांनी आभार मानले आहेत.