बेळगाव जिल्ह्यातील सौन्दत्ती येथे विना परवाना कृषी साधने विक्री करणाऱ्या दुकानावर कृषी खात्याच्या दक्षता विभागाने धाड टाकली आहे.
सौन्दत्ती तालुक्यातील अक्कीसागर गावात श्री अंजनेय ऍग्रो सेन्टर धाड टाकुन कारवाई केलेल्या दुकानाचे नाव आहे.या दुकानावर धाड टाकून कृषी साधन जप्त करत विक्री करणाऱ्यावर कारवाई केली आहे अशी माहिती कृषी खाते दक्षता विभागाचे संचालक जिलानी मोकाशी यांनी दिली.
कृषी खात्याचे अधिकारी आर बी पाटील व सुप्रिता अंगडी यांनी धाड टाकून कारवाईत सहभाग घेतला आहे.श्री अंजनेय ऍग्रो सेन्टरचे मालक चिदानंद एस कट्टी हे कृषी किटनाशक आणि बीज कृषी खात्याची परवानगी नसताना विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.
शेतकऱ्यांना बिल आणि कोणतीही ठोस कागदपत्रे नसताना कृषी साधने विक्री करताना सापडल्यास कारवाई केली जाईल असा इशारा देखील कृषी संचालक गिलानी मोकाशी यांनी दिला आहे.
सौन्दत्ती येथील धाडीत 190,000 रुपये किंमतीचे 30 विविध कंपन्यांचे किटनाशक,भाताची बियाणे, खते जप्त करत कारवाई करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी बियाणे खते किंवा कोणत्याही प्रकारचे किटनाशक कृषी खात्याची परवानगी असलेल्या दुकानातून खरेदी करावे असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे