बेळगाव शहरातील अन्य सेवाभावी संस्थांच्या खांद्यास खांदा लावून युवा सेना बेळगाव ही नव्या दमाची संघटना सध्याच्या कोरोना आणि लाॅक डाऊन काळात समाज सेवेसाठी पुढे सरसावली आहे. या संघटनेतर्फे सध्या दररोज सुमारे 250 गरीब गरजू लोकांना रात्रीचे जेवण पुरविण्याचा ‘मोफत शिव भोजन’ हा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे.
लाॅक डाऊन आणि संचारबंदी सारख्या कालावधीमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांचे पोटापाण्याचे हाल होत असतात. विशेष करून रस्त्यावर बेवारस फिरणाऱ्या गरीब भिकाऱ्यांची अवस्था अन्नपाण्याविना अतिशय दयनीय झालेली असते. हे ध्यानात घेऊन युवा सेना बेळगाव या संघटनेतर्फे ‘मोफत शिव भोजन’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत गरीब गरजू लोकांना रात्री जेवणाची पाकिटे वाटली जात आहेत. या पद्धतीने सध्या युवा सेना बेळगाव सुमारे 250 लोकांची पोटाची भूक भागवत आहे.
युवा सेना बेळगावच्या कार्यकर्त्यांनी प्रारंभी स्वखर्चातून सदर मोफत शिव भोजन वाटपाचा उपक्रम सुरू केला होता. मात्र त्यानंतर या संघटनेचे कार्य पाहून लोकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल डिस्टंसिंगच्या नियमामुळे सध्या या संघटनेचे मोजके 20 कार्यकर्ते मोफत भोजन पुरवण्याचा हा उपक्रम राबवीत आहेत.
यासाठी सकाळी भाजीपाला आणण्यापासून हे कार्यकर्ते दिवसभर गोरगरिबांच्या रात्रीच्या जेवणाची सोय करण्यामध्ये व्यस्त असतात. बाहेरून स्वयंपाकी न मागवता संघटनेचे कार्यकर्तेच स्वयंपाक बनवितात हे विशेष होय. स्वयंपाक तयार होऊन त्याचे पॅकिंग झाल्यानंतर दररोज सायंकाळी 7 -7:30 वाजण्याच्या सुमारास संघटनेचे कार्यकर्ते जेवणाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन भोजन वाटपासाठी बाहेर पडतात.
त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांसह गल्लोगल्लीत फिरून युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून भिकाऱ्यांसह असहाय्य गरीब गरजू लोकांची आस्थेने चौकशी करून त्यांना जेवणाचे पाकीट आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले जाते.
सध्या या संघटनेकडे भोजन व्यवस्थेसाठी जवळपास आठ दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. तथापी नाऊमेद न होता लॉक डाऊन संपून सर्वसामान्य जीवन सुरळीत होईपर्यंत ‘मोफत शिव भोजन’ हा उपक्रम राबविण्याचा निर्धार युवा सेना बेळगावने केला आहे.
@vinayakhulji @gauranggenji @mahesh majukar @vijaymohite @neel tavanshatti @aditya tirvir @advaith chavanpatil @vaibhavkamat @tejaslagade @pratikdesurkar
@Avdoot Kangralkar
@manish Khandagle
@radhe shapurkar
@sanket lohar
@vaibhav kamule
@Roshan Naik