युवक पार्टी करायला गेले असता पोलीस आले असे समजून पोलिसांना घाबरून पळताना एक तरुण विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी अतवाड येथील शेतीवाडीत घडली आहे. सोमवारी त्याचा मृतदेह त्या विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
मनोहर हुंदरे वय 27 रा. कंग्राळी के एच असे या विहिरीत बुडून मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.याबाबत काकती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोहर हा आपल्या मित्रां सोबत सोमवारी अतवाड आणि बेक्कीनकेरे गावाच्या मध्ये असलेल्या शेतवाडीत पार्टी करायला गेले होते.
त्यावेळी पोलीस आले असं कुणी तरी म्हटलं त्यावेळी सगळे जण पळून गेले त्यावेळी विहीरीचा अंदाज न आल्याने मनोहर विहिरीत पडला.
रविवारी रात्री काकती अतवाड येथील त्या विहिरीला भेट दिली मात्र अंधार झाल्याने घटनेची कल्पना त्यांना आली नाही सोमवारी मृतदेह बाहेर काढून नात लगांच्या हवाली करण्यात आला.
या घटने दरम्यान पळून जात असताना शेतातील विहिरीचा अंदाज न आल्याने तिघे जण विहिरीत पडले होते त्यातील दोघे वाचले एक बुडाला अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणी काकती पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.