बेळगाव जिल्ह्यात आता पर्यंत 6 लाख 24 हजार 485 जणांना कोविड वॅक्सीनचा लस देण्यात आली आहे मात्र आता त्याच जणांना दुसरा डोस प्राधान्य देऊन दिला जाणार आहे.
कोविशिल्ड वॅक्सिंनची पहिली लस घेतलेल्याना दुसरा डोस 42 दिवसा नंतर दिला जाणार आहे तर ज्यांनी कोवॅक्सिंनची पहिली लस घेतलेल्याना 28 दिवसा नंतर दुसरा डोस दिला जाणार आहे. सध्या बेळगाव जिल्ह्यात फक्त दुसरा डोस दिला जात आहे.
पहिला डोस घेतलेल्याना जिल्हा आरोग्य खात्या कडून दुसरा डोस दिला जाणार आहे त्यासाठी पहिला डोस घेतलेली तारीख आरोग्य खात्याने नोंद करून घेतली आहे.सध्या स्थितीत खाजगी रुग्णालयानी वॅक्सिंन देणे बंद केले आहे मात्र बिम्स आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात हळूहळू दुसरा डोस दिला जाणार आहे.