कोविड नियंत्रण करण्यासाठी बेळगाव जिल्हा वैद्यकीय विज्ञान संस्थेवर अल्पसंख्याक कल्याण खात्याचे अधिकारी गौरी शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी डॉ हरीश कुमार यांनी आदेश बजावला आहे.
जिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णावर सुरू असलेल्या उपचारावर लक्ष ठेऊन पहाणी करण्यासाठी तेथील उपचार व्यवस्थेची वस्तुस्थिती तासाला आढावा घेण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त केला असल्याचे जिल्हाधिकारी हरिशकुमार यांनी म्हटलं आहे.
कोविड रुग्णांना त्वरित ऑक्सिजन पुरवण्यासाठी खास नोडल अधिकारी नियुक्त झाला आहे.रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत त्यासाठी केवळ ऑक्सिजन पुरवठयावर लक्ष ठेवण्यासाठी बुडा योजना अधिकारी ईश्वर उळागड्डी यांना नेमण्यात आले आहे.
हे नोडल अधिकारी ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेऊन आहेत. दोन्ही नोडल अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी बिम्स मधील रुग्णांची आणि ऑक्सिजन पुवठ्या वर नियंत्रित करता य